पिंपरी | विधिज्ञ नारीशक्ती पुरस्कारांचे वितरण

पिंपरी, (प्रतिनिधी) – भाजपा कायदा आघाडी पिंपरी चिंचवड जिल्हा यांच्या वतीने वकिलांचा स्नेह मेळावा व विधिज्ञ नारीशक्ती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी अॅड. संगीता परब, ऍड शोभा कड, ॲड. दीपाली डुंबरे, अॅड. शोभा कदम ॲड तारा नायर यांना विधिज्ञा नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सायन्स पार्क, चिचवड येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, भाजपा कायदा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. धर्मेंद्र खांडरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. प्रत्येक मुलाच्या नावाबरोबर आईचे नाच समाविष्ट करून महिलांचा सन्मान वाढविला आहे. प्रत्येक प्रभागामध्ये विधी सेवा केंद्र सुरू करून मोफत सल्ला देण्यासाटी प्रयत्न करावे, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड धमेंद्र खांडरे यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष कायदा आघाडीचेअध्यक्ष ॲड. गोरखनाथ झोळ यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी अध्यक्षा अॅड. पल्लवी विघ्ने, युवा अध्यक्ष अॅड. हर्षद नढे यांनी व नारीशक्ती पुरस्कार समिती वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. मंगेश लोहारे, सरचिटणीस अॅड. गोरख कुंभार, उपाध्यक्ष अॅड अमोल माने, ॲड. अंकुश गोयल, चिटणीस अँड. सोपान पाटील, अॅड बालाजी पवार, अॅड जया गोरे, अॅड. मनाली सावंत यांची निवड करण्यात आली.

पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे, दक्षिण भारतीय आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडिगीरी, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शैलजा मोळक, सुजाता पालांडे, आर. एस. कुमार, सुरेश भोईर, राजू दुर्गे, अॅड. श्रीकांत दळवी, अॅड अतिश लांडगे, अॅड. रामराजे भोसले, अॅड प्रमिला गाडे तसेच पिंपरी चिंचवड वकिल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजपा कायदा आघाडीचे अध्यक्ष ॲड. गोरखनाथ झोळ यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅड. दत्ता झुळुक, अॅड. अजितकुमार जाधव, ॲड. नितिन पवार, ॲड. जॉर्ज डिसोजा, ॲड. वैशाली मुळीकर, अॅड प्रशांत भागवत, ॲड. विठ्ठल सोनार, अँड पुनम राऊत व महिमा उपाध्यक्षा अॅड. अंतरा देशपांडे, अॅड प्रियंका सुरवसे, महिला सरचिटणीस ॲड. प्रज्ञा कुलकर्णी, ॲड. संगीता कुशलकर आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन अॅड. सारिका कुलकर्णी व अॅड. मंगेश लोहारे यांनी केले. आभार अॅड. पल्लवी विघ्ने यांनी मानले.