Diwali : मुंबईत फटाके फोडणाऱ्या ८०६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Diwali – देशभरातील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना दिवाळीत (Diwali) फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणात वाढ होत असते. दिवाळीत फटाके वाजविण्यावर वेळेचे निर्बंध लादण्यात आले आहेत. परंतु दिवाळीच्या दिवसांमध्ये वेळेच्या मर्यादेनंतरही फटाक्यांची आतषबाजी झाल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.

यंदा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत घरोघरी दिवाळीचा उत्साह आणि आनंद दिसून येत आहे. गरीब, श्रीमंत, सर्वसामान्यांपासूनत ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी करत आहेत.

मात्र, मुंबईतील वायू प्रदुषणाच्या (Mumbai Air Pollution) पार्श्वभूमीवर हायकोर्टाने फटाके उडवण्यासाठी ठराविक वेळेची मर्यादा घालून दिली असताना देखील त्याच उल्लंघन झालं आहे.

दिवाळीत रात्री ८ ते रात्री १० या कालावधीत फटाके फोडण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी ७८४ खटले दाखल करण्यात आले असून ८०६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच गुन्हे दाखल झालेल्या ८०६ पैकी ७३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी १० ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ही कारवाई केली.