जिममध्ये वर्कआउट करताना राजू श्रीवास्तव यांना हार्ट अ‍ॅटॅक, AIIMSमध्ये दाखल

नवी दिल्ली – कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. दिल्लीच्या जिममध्ये व्यायाम करताना ते अचानक बेशुद्ध पडले, त्यानंतर दिल्लीतील एम्समध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की,’राजू श्रीवास्तव ट्रेडमिलवर धावत होते, त्याच दरम्यान ते अचानक बेशुद्ध पडले त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.’

कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव यांच्याबद्दलच्या या दु:खद बातमीने त्यांचे चाहते अस्वस्थ झाले आहेत. ते उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्षही आहेत. राजू श्रीवास्तव यांनी आपल्या कॉमेडीमुळे लोकांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. कानपूरचे असलेले राजू श्रीवास्तव हे मुंबईत कॉमेडी मास्टर म्हणूनही ओळखले जातात. ‘गजोधर भैया’ म्हणूनही त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली आहे.