आर्थिक फेरफारीच्या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी; सर्व ३२ आरोपांमध्ये आढळले दोषी

Donald Trump – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आर्थिक पेरफारीच्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. एखाद्या गुन्हेगारी स्वरुपाच्या आरोपामध्ये दोषी ठरवले जाणारे ते अमेरिकेत्या इतिहासातील पहिले माजीअध्यक्ष ठरले आहेत. पोर्न स्टारला गप्प बसण्यासाठी ट्रम्प यांनी जे पैसे दिले, त्याचा तपशील आपल्या व्यवसायिक नोंदींमधून वगळण्याचा आरोप सिद्ध झाल्याचे विशेष ज्युरींनी आपल्या निकालपत्रामध्ये म्हटले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीपुर्वी ट्रम्प यांनी ही फेरफार केली होती.

गेल्या दोन दिवसांपासून ट्रम्प यांच्या आरोपाबाबत जोरदार वादविवाद सुरू होते. त्यामध्ये ट्रम्प यांच्यावर ३४ आरोप ठेवले गेले होते. या सर्वच्या सर्व ३४ आरोपांमध्ये सर्व १२ ज्युरींनी एकमताने ट्रम्प यांना दोषी मानले आहेत. या गुन्ह्यात ट्रम्प यांना जास्तीत जास्त ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. खरे तर अशा प्रकरणात दोषी आढळलेल्यांना यापेक्षा कमी कालावधीची शिक्षा किंवा दंडाच्या स्वरुपाची शिक्षा होऊ शकते.

शुक्रवारी ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर न्यायाधीश जुआन. एम. मेर्चान यांनी शिक्षेची सुनावणी ११ जुलै रोजी करण्याचे जाहीर केले आहे. अध्यक्षपदाची मुख्य निवडणूक ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी रिपब्लिकन पक्षाकडून अंतिम उमेदवारी दिली जाण्याच्या काही दिवस आगोदर त्यांना ही शिक्षा सुनावली जाणार आहे. मात्र जरी ट्रम्प यांना शिक्षा झाली, तरी त्यामुळे त्याना अध्यक्षपदाची निवडणूक लढवल्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असे मानले जाते आहे.

ट्रम्प यांनी मात्र आपण काहीही गैर केलेले नाही, हा दावा कायम ठेवला आहे. न्यूयॉर्कमधील न्यायालयाच्या निकालाविरोधात लवकरात लवकर अपील केले जाईल, असे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे. हा निकाल म्हणजे आपला अपमान आहे. आपण निरपराध आहोत. हे प्रकरण म्हणजे आपल्याविरोधातील राजकीय कुभांड आहे. खरा निकाल ५ नोव्हेंबरला जनतेकडून दिला जाणार असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.

तर या निकालामुळे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, हेच सिद्ध झाल्याची प्रतिक्रीया ज्यो बायडेन यांनी दिली आहे.निवडणुकीमध्ये ट्रम्प यांना पराभूत करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. अमेरिकेच्या संसदेचे सभापती माईक जॉन्सन यांनी देखील या निकालावरून ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. आजचा दिवस अमेरिकेच्या इतिहासातील लाजिरवाणा दिवस असल्याची प्रतिक्रीया दिली आहे.

अध्यक्षीय उमेदवारीसाठीची शर्यत जोरात सुरू…
अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाकडून विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात जोरदार शर्यत सुरू आहे.

मात्र न्यायालयाकडून आर्थिक फेरफारीच्या आरोपात दोषी ठरवल्यामुळे ट्रम्प यांच्या लोकप्रियतेमध्ये घट होईल. अपक्ष आणि रिपब्लिकन पक्षाच्या हक्काच्या मतदारांमधून त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यात घट होऊ शकते, असा अंदाज काही वृत्तसंस्तांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये वर्तवण्यात आला आहे.