पुणे जिल्हा | रक्त, अन्न, नेत्रदान हेच खरे जीवनदान अभयदान

आळंदी (वार्ताहर) – जीवनात सन्मार्गांनी कमावलेले धन-संपत्ती ही अन्नदानासारख्या समाज उपयोगी उपक्रमात वापरली तर ती कधीही नाश पावत नाही उलट त्यात दिवसेंदिवस वाढच होत असते. रक्तदान हे सुद्धा एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवणारे ठरते व मरणोत्तर केलेले नेत्रदान एखाद्याच्या अंधकारमय जीवनात प्रकाश देणारे ठरते व पर्यायाने दानात सर्वात मोठे असलेले अभयदान होते, असे प्रतिपादन प्रशांत ऋषीजी म. यांनी केले.

स्व. कांतीलालजी नंदरामजी चोरडिया यांच्या जन्मतिथीचे औचित्य साधून श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ व सतीशजी कांतीलालजी चोरडिया व परिवाराच्या वतीने रक्तदान, अन्नदान व नेत्रदान (फॉर्म भरून घेणे) तसेच महावीर की रोटी या उपक्रमाचे उद्घाटनही करण्यात आले.

याप्रसंगी शेतांबर स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, उपाध्यक्ष सतीश चोरडिया, माजी नगराध्यक्षा शारदा वडगावकर, ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उमेश बागडे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, मदनलाल बोंरूदिया, मोहनलाल चोपडा, सागर बागमार, श्याम कोलन,

दिलीप नहार, राजेंद्र लोढा, राजेंद्र धोका, शांतीलाल चोपडा, सचिन बोरूंदिया, ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे विश्वंभर पाटील, हनुमंत तापकीर, ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक डीएम मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, तुषार नहार, राजू बाफना, महावीर मुथा ,अविनाश बोरुंदिया, नंदकुमार वडगावकर आदी तसेच सकल जैन बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

49 जणांचे रक्तदान
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरामध्ये दर्शना करता आलेल्या शंभर भाविकांना अन्नदान महाप्रसाद म्हणून देण्यात आले. 49 जणांनी रक्तदान केल. केईएम ब्लड बँकेचे डॉ. धुमाळ व त्यांच्या सहकार्‍यांनी रक्तसंकलनाचे काम यशस्वीरित्या पार पाडले. याप्रसंगी हिराबाई सेटीया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. गौतमचंद सेटीया यांनी पन्नास जणांचे मरणोत्तर नेत्रदानाचे फॉर्म भरून घेतले.