चंदिगढमध्ये ‘दोस्ताना २’ च्या शूटिंगला सुरूवात

मुंबई – बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शक करण जोहरचा आगामी चित्रफट दोस्ताना 2 मध्ये कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता सुरूवात झाली आहे. कार्तिकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सेटवरचा फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

#Dostana2 Begins !!! ???‍♂️? @karanjohar @janhvikapoor @itslakshya @collindcunha ❤️

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअक केला आहे. ज्यामध्ये तो एक क्लॅप हातात पकडलेला दिसून येत आहे. चंदिगढमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली असून, चित्रपटाची संपूर्ण टीम तिथे पोहचली आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे.

Leave a Comment