डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेले प्रतापसिंह हायस्कूल घेतेय उभारी

जिल्हा परिषद – रयत शिक्षण संस्थेत लवकरच सामंजस्य करार; रुपडे पालटणार
संतोष पवार
सातारा –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेले प्रतापसिंह हायस्कूल टिकावे, या शाळेचा नावलौकिक कायम राहावा यासाठी सातारा जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून हे हायस्कूल आता उभारी घेत आहे. सातारा जिल्हा परिषद आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये याबाबत लवकरच सामंजस्य करार होणार असल्याने या हायस्कूलचे रुपडे पालटणार आहे.

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी मध्ये संस्थानातील मुलामुलींना शिक्षण मिळावे या हेतूने खासगी पाठशाळा सुरु केली. मध्ये औपचारिक शिक्षणाची सोय व्हावी याकरीता सातारा एलिमेंटरी स्कूलची रितसर स्थापना झाली. कालांतराने त्याचे नाव शासकीय शेती शाळा असे झाले. या शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने मध्ये शाळेचे नामकरण श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल करण्यात आले. राजवाड्याच्या प्रशस्त इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेत होते. दैनंदिन शिक्षणाबरोबर टायपिंग, वाणिज्य, शेती इत्यादी व्यावसायिक शिक्षण याठिकाणी दिले जात होते. या शाळेतील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती पी. बी. गजेंद्रगडकर, उद्योगपती डी. बी. कपूर, भारतीय बिमा निगमचे संस्थापक व्ही. जी. चिरमुले अशा महान हस्तींनी या शाळेतून शिक्षण घेवून आपला अटकेपार झेंडा रोवला आहे.

प्रतापसिंह हायस्कूलने कित्येक वर्षे आपला चढता आलेख कायम राखला. मात्र काळाच्या ओघात सातारा शहरात हायस्कूल सुरु झाली. यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांचाही समावेश आहे. त्यामुळे भौतिक सुविधेअभावी या शाळेचा पट कमी होत गेला. या शाळेची समृध्द आणि उज्ज्वल परंपरा लक्षात घेऊन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, विद्यमान अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी सभापती राजेश पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी या नामांकित शाळेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचा विडा उचलला.

प्रतापसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा शिक्षण विस्तार अधिकारी सन्मती देशमाने यांनी तर जीव ओतून या शाळेसाठी काम केले. अडचणी आल्या तरी ही शाळा पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास त्यांना आहे. जिल्हा परिषद आणि रयत शिक्षण संस्था यांच्यात लवकरच एक सामंजस्य करार होत आहे. त्यानुसार रयत शिक्षण संस्थेचे सहकार्य या हायस्कूलला मिळणार आहे. जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर केल्याने प्रतापसिंह हायस्कूल निश्‍चित उभारी घेणार यात काही शंका नाही.

प्रतापसिंह हायस्कूलच्या राजवाडा परिसरातील वसतीगृह इमारतीचे नुतनीकरण करण्यात आले आहे. सुसज्ज स्वच्छतागृहे, क्रीडांगण, विद्युतीकरण आदी कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व जीवन कौशल्याशी निगडीत शिक्षण देण्यासाठी शिक्षक वर्ग मानसिकदृष्ट्या तयार झालेला आहे. आता तर रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांचे सहकार्य घेतले जाणार आहे. शाळेत येणारा विद्यार्थी कसाही असो त्याला टक्के प्रगत करण्याची हमी आम्ही देत आहोत. प्रत्येक वर्ग डिजीटल करुन आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. सध्या ऑनलाईन प्रवेशासह चांगला प्रतिसाद मिळत असून हे हायस्कूल निश्‍चित उभारी घेईल.
सन्मति देशमाने, मुख्याध्यापक प्रतापसिंह हायस्कूल, सातार

Leave a Comment