गटशिक्षणाधिकाऱ्याच्या घोळामुळे शिक्षकांचे आंदोलन रात्रीही सुरू…

पाथर्डी – प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनेच्या प्रक्रियेतून गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी काढता पाय काढल्याने संतप्त झालेल्या २९ प्राथमिक शिक्षकांनी पंचायत समितीच्या सभागृहात धरणे आंदोलन सुरू केले.गट विकास अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या घोळात व गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील २९ शिक्षकांच्या समायोजन प्रश्न रखडला आहे. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता पंचायत समितीच्या सभागृहात शिक्षकांच्या समायोजनेची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र त्यामध्ये अनेक मुद्दे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी उपस्थित करून या प्रक्रियेतून काढता पाय घेतला आहे.हा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही,असा पवित्रा आंदोलक शिक्षकांनी घेतला असून यामध्ये नऊ महिला शिक्षक सहभागी झाले आहेत.

 याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील समायोजनेचा इतर तालुक्यातील समायोजनेचा तिढा सुटला असून असला तरी ही पाथर्डी तालुक्यात मात्र गुंता वाढला आहे. येत्या ३१ तारखेपर्यंत हा प्रश्न मिटला नाही तर आंदोलक शिक्षकांना तालुका बाहेर जावा लागत असल्याने शिक्षकांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे.आज शुक्रवारी दुपारी चार वाजता सर्व समायोजन ना मधील शिक्षकांना पंचायत समितीच्या कार्यालयात चर्चेसाठी बनवण्यात आले होते नेमकी याचवेळी जुने गटशिक्षणाधिकारी डॉ. जगदीश पालवे यांनी आपला पदभार नव्याने नियुक्त झालेले गट विकास अधिकारी कांबळे यांच्याकडे सुपूर्त केला.

दोन्ही गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी अनिल भवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरू झाली. आपले समायोजना होईल असे सर्व शिक्षकांना यावेळी वाटले.मात्र सर्वाधिकारी उपस्थित शिक्षकांच्या सह्या घेऊन निघून गेल्याने पुढे काय या प्रश्नाने आंदोलक धास्तावले व त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले.यावेळी बोलताना आंदोलन म्हणाले की, गेल्या चार महिन्यापासून गटशिक्षणाधिकारी आम्हाला समायोजन प्रक्रिया राबवण्यासाठी बोलतात मात्र प्रत्यक्षात कोणतीही कृती केली जात नाही.त्यांचे फक्त आम्हाला हेलपाटे मारण्याचे काम त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांची भूमिका धरसोडीची असून वरिष्ठ कार्यालयाने योग्य ते मार्गदर्शन करू नये, ही प्रक्रिया का राबवत नाही हे आम्हाला समजू शकत नाही.

नेमकी आमच्या समायोजनाच्या जागा कोणाला द्यायचे आहेत असा प्रश्न आम्हाला पडला आहे. प्रशासनाने समायोजनेची प्रक्रियाच राबवले नाही. प्रक्रिया सुरू असताना अधिकाऱ्यांनी प्रक्रियेतून जाणे कितपत योग्य आहे.रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी अनिल भवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही.

३१ डिसेंबर पर्यंत समायोजन करण्याचे आदेश संबंधितांना दिले होते .आज का? समायोजनाची प्रक्रिया झाली नाही. हे समजू शकत नाही.यासंदर्भात कारणे दाखवा नोटीसा अधिकाऱ्यांना बजावल्या आहेत.भास्कर पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी अ. नगर