शिवसेनेच्या खासदार भावना गवळींना ईडीची नोटीस

मुंबई – शिवसेनेचे नेते आनंदराव अडसुळ यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना ईडीची नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यांना 4 ऑक्‍टरोबर रोजी एका मनी लॉंड्रिंग प्रकरणात दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

भावना गवळी या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातील खासदार आहत. या प्रकरणात त्यांचे एक सहकारी सईद खान यांना या आधीच अटक करण्यात आली आहे. भावना गवळी यांनी सार्वजनिक ट्रस्टचे एका खासगी कंपनीत रूपांतर करून सुमारे अठरा कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ईडीचा आरोप आहे. यासाठी त्यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर केला तसेच खोटी कागदपत्रे सादर केली, असेही ईडीचे म्हणणे आहे.