AAP खासदार संजय सिंह यांच्या घरावर EDचा छापा; अरविंद केजरीवाल म्हणाले,’काहीच मिळणार नाही…’

 Sanjay Singh ED Raids :  नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यावर प्रतिक्रिया दिली. अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘गेल्या एक वर्षापासून आम्ही दारू घोटाळा पाहत आहोत. कुठेही काहीही सापडले नाही. या लोकांनी बरेच छापे टाकले आहे. दारू घोटाळ्यात अद्याप काहीही सापडलेले नाही.’

संजय सिंह यांच्या घरी काहीही सापडले नसल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत  भाजप पक्ष स्वःताचा पराभव पाहून हे सर्व घडत आहे. निवडणुका जवळ आल्या की या सर्व एजन्सी छापे मारण्यासाठी सक्रिय होतात.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, ‘गेल्या एक वर्षापासून तथाकथित दारू घोटाळ्याबाबत बराच गाजावाजा होत असल्याचे दिसून येत आहे, मात्र त्यांना एक पैसाही मिळाला नाही. 1,000 हून अधिक छापे टाकण्यात आले आणि कुठूनही वसुली झाली नाही. कधी वर्गखरेदीत घोटाळा झाला, बस खरेदीत घोटाळा झाला असे सांगतात, प्रत्येक गोष्टीची चौकशी झाली. संजय सिंगच्या जागेवरही काहीही मिळणार नाही.’

ते पुढे म्हणाले की,’पुढच्या वर्षी निवडणुका येत आहेत आणि भाजप येत्या निवडणुकांमध्ये हरणार आहे त्यामुळे त्यांच्याकडून विरोधी पक्षाची प्रतिमा छापेमारू करून खराब करण्याचा प्रयत्न सुरु आहे.’ असेही केजरीवाल म्हणाले आहे.