46 वर्षांपूर्वी प्रभात : भुट्टोंच्या फाशीवर भारताने व्यक्त व्हावे….

44वे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर

मुंबई, दि. 4 – 44वे घटना दुरुस्ती विधेयक राज्य विधानसभेत मंजूर करण्यात आले. उद्योगमंत्री शरद पवार यांच्यासह 108 सदस्यांनी विधेयकास पाठिंबा दिला.

भुट्टोंच्या फाशीवर भारताने व्यक्त व्हावें

जम्मू – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान भुट्टो यांना झालेल्या फाशीच्या शिक्षेवर भारत सरकारने आपली भूमिका व्यक्त करावी, असे इंदिरा गांधी म्हणाल्या. इतर देशांच्या व्यवहारात आपण ढवळाढवळ करता कामा नये मात्र इतर देशांचे लक्ष वेधून घेणार्‍या घटनांबाबत आपण गप्पही राहू शकत नाही.

निवडणूक कायदा दुरुस्तीबाबत योजना

नवी दिल्ली – निवडणूक कायद्यात करावयाच्या अनेक सुधारणा सरकारच्या विचाराधीन आहेत. उमेदवारांच्या प्रचार खर्चास सरकारने पैसा पुरविणे, ही त्यापैकी एक आहे. काही महिन्यांत याबाबत निश्‍चित योजना तयार होतील. कंपन्यांनी राजकीय पक्षांना देणग्या देण्यावर बंदी घातलेलीच आहे. परंतु व्यापार्‍यांनी व्यक्तिशः देणग्या देण्यावर मात्र बंदी घालणे विचाराधीन नाही. रामजी सिंग यांनी आठवण करून दिली की भ्रष्टाचार माजविणार्‍या अशा तर्‍हेच्या देणग्यांना आळा घालण्याचे अभिवचन जनता पक्षाने दिले होते.