अज्ञानापेक्षा अहंकार अधिक धोकादायक; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

नवी दिल्ली: देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या बाबतीत सतत होणाऱ्या वाढीबद्दल कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी अप्रत्यक्षपणे सरकारवर निशाणा साधला. भारतात लादण्यात आलेल्या लॉकडाऊनने हे सिद्ध केले की, अज्ञानापेक्षा अहंकार अधिक धोकादायक आहे, असे ते म्हणाले.

थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या विधानाचा संदर्भ देताना त्यांनी ट्विट केले आहे, ‘लॉकडाउन हे सिद्ध करते की अज्ञानापेक्षा धोकादायक एकमेव गोष्ट म्हणजे अहंकार.’ लॉकडाऊनच्या चारही टप्प्यांत कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये होणाऱ्या वाढीसंदर्भातही त्यांनी एक ग्राफ सुद्धा त्यांनी शेअर केला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सलग तिसर्‍या दिवशी भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या 11,000 हून अधिक घटना घडल्या असून सोमवारी संसर्ग होण्याचे प्रमाण 3,32,424 वर गेले आहे. संक्रमणामुळे होणाऱ्या  325 मृत्यूंसह मृतांची संख्या 9,520 वर पोचली आहे.

महत्त्वाचे म्हणजे अमेरिका, ब्राझील आणि रशियानंतर कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वाधिक त्रस्त झालेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी आला आहे.

Leave a Comment