एकनाथ खडसे रुग्णालयात दाखल

मुंबई  – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांच्यावर क्रिटीकल शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांच्या वकिलाने दिली.

दरम्यान, एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी याच प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. याप्रकरणी ईडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. त्यात खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी या दोघांची आरोपी म्हणून नावे आहेत.

हे सर्व 2016चे प्रकरण असून त्यावेळी एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. महत्त्वाचे म्हणजे एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी सध्या अटकेत आहेत.