‘मुख्यमंत्री बदलाच्या केवळ वावड्या, तसे काही होणार नाही’; ‘या’ बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

Eknath Shinde | Chief Minister – लोकसभा निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलले जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तथापि, आमची महायुती मजबूत आहे आणि मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. मुख्यमंत्री खंबीर आहेत आणि राज्यकारभार जोमाने करतील, असे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.

संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. ते म्हणाले की बदलाची अशी कोणतीही चर्चा नाही. मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. काही लोकांना वावड्या उठवण्याची सवय असते. मुख्यमंत्री खंबीर आहेत. मजबुतीने आहेत.

निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री बदलण्याचे नो चान्सेस आहेत. एकदम घट्ट आहेत. जोरात काम करणारे मुख्यमंत्री आहेत. 24 तास काम करणारा मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे. मुख्यमंत्री बदलला जाणार नाही.

यावेळी त्यांनी पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरही भाष्य केले. अजितदादांनी फोन का केला? त्याने का केला नाही. याने का केला? अशा चर्चांना काही अर्थ नाही.

या घटनेत दोन जणांचा जीव गेला आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याच्याशी सरकार सहमत आहे. पोलीस प्रशासन त्या दृष्टीने काम करत आहे, असे शिरसाट म्हणाले.

शिरसाट यांनी शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाबाबतही एक वक्तव्य केले. शरद पवारांनी ठाकरे गटाला आपलेसे केले याचे कारण संजय राऊत आहेत. शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे. त्यासााठीच ते एव्हढे ॲक्टिव्ह आहेत.

अमित शाह हेच सांगत आहेत की, शरद पवारांनी जी गुगली टाकली, त्यामुळे आज ठाकरे गटाची ही अवस्था झाली आहे. महायुतीबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, आमच्याकडे असलेल्या जागा आणि अजितदादांकडे असलेल्या जागा वाटप सन्मानजनक होईल.

गजानन किर्तीकर यांच्या वक्तव्यांनी शिवसैनिक देखील नाराज आहे. लोकसभेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि किर्तीकर भेटतील आणि निर्णय घेतील. असं ते यावेळी म्हणाले.