पिंपरी | तेलवण कार्यक्रमाने एकवीरादेवी यात्रेची सांगता

कार्ला, (वार्ताहर) – महाराष्ट्राचे आराध्य दैवत व लाखो कोळी, आग्री, कुणबी, सोनार आदी समाजाची कुलस्वामिनी आई एकवीरादेवी यात्रा सुरू असून मंगळवारी (दि. १६) पहाटे तेलवणच्या कार्यक्रमाने कार्ला वेहरगाव आई एकवीरा देवी चैत्री यात्रेची सांगता झाली.

सोमवारी सायंकाळी पालखी झाल्यानंतर मंगळवारी पहाटे चार वाजता दुसरा मुख्य आकर्षणाचा तेलवणाचा कार्यक्रम वेहरगाव दहिवली ग्रुपग्रामपंचायत सरपंच व देवस्थानच्या विश्वस्त वर्षा मावकर व तेलवणचे मानाचे मानकरी चौलचे आग्रावर व पेणचे वासकर महिला प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आला.

रविवार, सोमवार आणि मंगळवार असे तीन दिवस चैत्रयात्रा काळात भाविकांनी कार्ला वेहरगाव डोंगरावर गर्दी केली होती. मावळचे तहसिलदार विक्रम देशमुख, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, विश्वस्त नवनाथ देशमुख, मारुती देशमुख, सागर देवकर,

विकास पडवळ, महेंद्र देशमुख, संजय गोविलकर, पोलीस सहायक निरीक्षक सागर आरगडे, उपनिरिक्षक भारत भोसले, किशोर शिवते, मंडल अधिकारी आशा धायगुडे, पोलीस पाटील अनिल पडवळ, संपूर्ण पोलीस प्रशासन, देवस्थान प्रशासन व इतर सर्व विभागाच्या सहकार्याने यात्राकाळात केलेल्या पार्किंग व्यवस्था, पर्यायी रस्ता, पोलीस मित्र, विविध सामाजिक संस्था यांच्या सहकायनि केलेल्या योग्य नियोजनामुळे यात्रा शांततेत पार पडली.