आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आज नोटीस बजावली आहे. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी ट्विटर खात्यावरून,  आम आदमी पक्षाच्या पूर्व दिल्लीतील उमेदवार अतीशी यांच्या धर्माबाबत उल्लेख केल्याने, निवडणूक आयोगाकडून मनीष सिसोदिया यांना आदर्श आचारसंहिता भंगाची नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने उद्या म्हणजेच बुधवारी ५ वाजेपर्यंत मनीष सिसोदिया यांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

Leave a Comment