मनसेला निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या बदललेल्या नव्या झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर केला आहे. राजमुद्रेला राज्य निवडणूक आयोगाने आक्षेप घेत मनसेला नोटीस बजावली आहे. आयोगाच्या नोटीसला मनसे कोणते उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 23 जानेवारी रोजी महाअधिवेशनात पक्षाचा जुना झेंडा बदलला. नव्या भगव्या झेंड्यात त्यांनी शिवमुद्रेचा वापर केला आहे. त्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी अवैध पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरोधात काढलेल्या महामोर्चामध्ये महाराष्ट्र सैनिकांनी हाच नवीन झेंडा फडकवला होता. मात्र या झेंड्यामध्ये शिवमुद्रा वापरल्याने त्याला आक्षेप घेण्यात आला आहे.

संभाजी ब्रिगेड, जय हो फाउंडेशन आणि अखिल भारतीय मराठा महासंघ या संघटनांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मनसे हा राजकीय पक्ष असून राजकीय पक्षाने थोर व्यक्‍ती व चिन्हांचा गैरवापर केला असल्याच्या आशयाची ही तक्रार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या तक्रारींची दखल घेउन या संदर्भातील नोटीस मनसेला बजावली आहे.

 

Leave a Comment