पिंपरी | अध्‍यक्षपदी किशोर सातकर यांची निवड

कान्हे, (वार्ताहर) – कान्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्‍या अध्‍यक्षपदी किशोर पंढरीनाथ सातकर तर उपाध्‍यक्षपदी अनिल मोहिते यांची बिनविरोध निवड झाली.

वडगाव येथील सहकारी निबंधक कार्यालयात झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी एम.ए.कुलकर्णी, सचिव गणपत भानुसघरे, संचालक दशरथ सातकर, बंडोबा सातकर, अशोक सातकर, प्रदिप ओव्हाळ, विलास जांभूळकर, एकनाथ येवले, दत्तात्रय शिंदे, सुदाम आगळमे, मंदा गाडे, नंदाताई सातकर, देवराम सातकर, विठ्ठल मोहिते उपस्थित होते.

कान्हे सोसायटीचे कार्यक्षेत्र कान्हे, साते, मोहितेवाडी, ब्राम्हणवाडी आणि जांभूळ या गावांचे असून सर्व शेतकरी बांधवांना शेती कर्ज, खत, शेती अवजारे व पुरक व्यवसाय करण्यास सहाय्य करणार, असे नवनिर्वाचित अध्‍यक्ष किशोर सातकर यांनी सांगितले.