कार्याध्यक्षपदी राकेश कामठे यांची निवड

पुणे : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी राकेश कामठे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी कामठे यांनी नियुक्तीचे राकेश कामठे यांना दिले. प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख, पुणे शहर कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, पनवेश शहराध्यक्ष प्रमोद बागल यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कामठे हे महाविद्यालयीन जीवनापासून पक्षात कार्यरत असून त्यांनी पुणे शहर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस अध्यक्ष त्यानंतर युवक शहराध्यक्ष तसेच युवक प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली असून कोंढवा परिसरात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे ते पक्षात सक्रीय कार्यरत आहेत.