शिवजयंती साजरी न करण्याऱ्या इंग्रजी शाळांना “मनसे’चा दणका

विश्रांतवाडी – इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिवजयंती साजरी होत नव्हती, ही बाब समजल्यानंतर अशा शाळांमध्ये जाऊन शिवजयंती साजरी का करीत नाहीत, याचा जाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापकांना विचारून शिवाजी महाराजाची माहिती देत तसेच मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील खुर्चीवर शिवप्रतिमा ठेऊन त्यांच्या हस्ते पूजन करायला लावून नतमस्तक होऊन पुष्पहार घालून शिवजयंती साजरी करण्यात आली.

वडगावशेरी मनसे उपशहाराध्यक्ष हेमंत बत्ते यांच्या नेतृत्वाखाली सचिव रमेश जाधव,विभाग सचिव श्रीनिवास दिसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी सदर उपक्रम राबविला. मनसेतर्फे प्रत्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळेला भेट दिलेली प्रतिमा धूळखात पडली होती. त्या सर्व प्रतिमा स्वच्छ करण्यात आल्या.

येथील ऑरनॉल्ड स्कूलचे मुख्याध्यापक जॉयसन कुरियन, सेन्ट फ्रॉन्सीस स्कूलचे रोजारिओ ऑथोनी स्वामी यांनी या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्‍त करीत यापुढे शाळेत शिवजयंती साजरी केली जाईल, अशी हमी दिली. यावेळी मनसे शाखध्यक्ष प्रणव जोशी, मदन अष्टेकर, गौरव कश्‍यप आदि पदाधिकारी उपस्थित होते.