Happy Birthday Rekha : वयाच्या ६९ वयातही रेखा दिसते ‘फिट और ब्यूटीफुल’ जाणून घ्या ‘ब्युटी मंत्रा’

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच फिटनेस आणि सौंदर्यामुळे अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. रेखा आज तिचा ६९ वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी रेखा तिचा सुंदर लुक राखण्यासाठी खूप मेहनत घेते. तिचा फिटनेस आणि सौंदर्याचा मंत्र अगदी सोपा आहे, जो कोणीही चमकदार टोन्ड बॉडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवलंबू शकतो. चला जाणून घेऊया या सुंदर बॉलिवूड अभिनेत्री रेखाचा फिटनेस आणि ब्युटी मंत्र कोणता आहे.

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री रेखाचा आज वाढदिवस… बॉलीवूडमधील सौंदर्यवती अभिनेत्रींपैकी रेखा या एक अभिनेत्री आहे. वाढत्या वयासोबत रेखा यांचे सौदर्यही दिवसेंदिवस अधिक खुलत गेले आहे. रेखा या वयातही खूपच सुंदर दिसत असून आजही त्यांचे सौंदर्य युवा अभिनेत्रींच्या तोडीसतोड आहे. रेखा यांच्या बर्थ डेनिमित्त जाणून घेवू या त्यांच्या सौंदर्याचे रहस्य. रेखा या दिवसभरातून सुमारे 10-12 ग्लास पाणी पितात.

पाण्यामुळे आपल्या शरीरातील सर्व विकार बाहेर पडतात आणि आपले सौंदर्य व चेहऱ्यावरील ग्लो कायम राहण्यास मदत मिळते. रेखा यांनी याच पद्धतीने आजही आपल्या चेहऱ्यावरील ग्लो कायम ठेवला आहे. तसेच रेखा यांनी तळलेले पदार्थ खाण्याचे कायम टाळले आहेत. त्यांनी आपल्या दररोजच्या आहारात ताज्या भाजी, दही आणि सलाद खाण्यावर भर दिला आहे.

तसेच भात जास्त न खाता चपाती खात असल्याचे रेखा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. वयाची साठी पार केलेली असली तरी रेखा यांनी स्वतःला चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेले आहे. यासाठी त्या नियमितपणे व्यायाम आणि योगा करत असतात. तसेच रात्री 8 वाजता डिनर केल्यानंतर त्या लवकर झोपी जातात. याशिवाय रेखा फक्‍त आयुर्वेदिक स्पा ट्रीटमेंट घेत असतात. यामुळेच आजही त्यांचे सौंदर्य हे अबाधित आहे.

Leave a Comment