”डराया , धमकाया गया तब भी हम झुकेंगे नहीं..!”

मुंबई –  शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अखेर अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आर्थिक फेरफारप्रकरणी ईडीकडून करण्यात आली आहे. प्रवीण राऊत हे एचडीआयएलची सहयोगी कंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्‍शन्सच्या संचालक मंडळावर आहेत. गोरेगावमधील एका प्लॉटच्या व्यवहारात एफएसआयचा घोळ केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात आर्थिक फेरफार करून पैसे लाटल्याच्या आरोपाची चौकशी सुरू आहे.

तर दुसरीकडे यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. संजय राऊत यांनी याच संदर्भात ट्विट केले आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ट्विट टॅग केले आहे.

संजय राऊत यांचे ट्विट

‘आधी आमिष दाखवले, ऑफर्स दिल्या. मग घाबरवले, धमकावले पण आम्ही झुकलो नाही. नंतर कुटुंबाला धमकावले. आम्ही दुर्लक्ष केले, जाऊ दिले. त्यानंतर केंद्रीय एजन्सी आमच्या मागे लावल्या. हे असेच 2024 पर्यंत चालेल..पण आम्ही कधीच झुकणार नाही!’, असे राऊत म्हणाले.