‘INDIA’ आघाडी NDA ला सत्तेची हॅट्ट्रिक करण्यापासून रोखू शकेल का? ; आज एक्झिट पोलमधून होणार चित्र स्पष्ट

Exit Poll 2024 । लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यातील मतदान आज संध्याकाळी पूर्ण होणार आहे. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल जाहीर होतील. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएने सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, तर ‘इंडिया’ आघाडीने भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली.

निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही सात टप्प्यांत निवडणुका झाल्या. पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिलला मतदान झाले होते. या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी 13 राज्यांमधील 88 जागांसाठी मतदान झाले. मध्य प्रदेशातील बैतुलमधील निवडणुकीची तारीख बदलून ७ मे करण्यात आली.

7 मे रोजी 12 राज्यांतील 93 जागांवर मतदान झाले. गुजरातमधील सुरतमध्ये भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. याशिवाय जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग-राजौरी जागेवर तिसऱ्या टप्प्याऐवजी २५ मे रोजी मतदान झाले. चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी 10 राज्यांतील 96 जागांवर मतदान झाले. पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी 8 राज्यातील 49 जागांसाठी मतदान होत आहे, सहाव्या टप्प्यात 7 राज्यांच्या 58 जागांसाठी 25 मे रोजी आणि 7व्या टप्प्यात 1 जून रोजी 8 राज्यांतील  57 जागांसाठी मतदान होत आहे.

2019 मध्ये निकाल कसे लागले? Exit Poll 2024 ।

– 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. एनडीएला 351 जागा मिळाल्या होत्या, तर यूपीएला 90 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला 52 जागा मिळाल्या होत्या.

2019 मध्ये पक्षाला जागा % मते Exit Poll 2024 ।
 

पक्ष                          जागा                  टक्केवारी

भाजप                     303                          37.30%

काँग्रेस                     52                              19.46%

TMC                        22                             4.06%

बसपा                       10                               3.62%

एसपी                        5                               2.55%
यएसआर काँग्रेस           22                           2.53%

DMK                         24                              2.34%

शिवसेना                     18                                  2.04%

JDU                          16                                  1.45%

एक्झिट पोल म्हणजे काय?

18 व्या लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा 1 जून रोजी आहे. १ जून रोजी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल जाहीर होतील. मतदानानंतर आणि निवडणूक निकालापूर्वी एक्झिट पोल जाहीर केले जातात. एक्झिट पोलच्या माध्यमातून मतदारांनी कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान केले, असे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला जातो. या आधारे एक्झिट पोल तयार केला जातो. एक्झिट पोलवरून निवडणुकीच्या निकालांचा अंदाज लावला जातो. भारतात कोणतीही सरकारी एजन्सी एक्झिट पोल आयोजित करत नाही, परंतु अनेक खाजगी एजन्सी आहेत ज्या एक्झिट पोल आयोजित करतात. अनेक वेळा एजन्सी जनतेचा मूड जाणून घेण्यात यशस्वी होतात आणि एक्झिट पोल बरोबर असल्याचे सिद्ध होते. मात्र, काही वेळा हे अंदाजही चुकीचे ठरतात.