पिंपरी | हयातीच्या दाखला सर्वेक्षणास मुदतवाढ

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील विविध दिव्यांग योजनांचा लाभ घेणार्‍या दिव्यांग व्यक्तींच्या हयातीचा दाखल्याबाबत घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाची मुदत 26 फेब्रुवारी 2024 रोजी संपलेली असून 27 फेब्रुवारी 2024 पासून 26 मार्च 2024 पर्यंत या सर्वेक्षणाला मुदत वाढ देण्यात आली आहे

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागातंर्गत येणार्‍या दिव्यांग कक्षाच्या वतीने विविध दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांतर्गत दि.26 डिसेंबर 2023 पासून 60 दिवसापर्यंत हे सर्वेक्षण कडेले जाणार आहे.

ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचा राहण्याचा पत्ता, मोबाईल नंबर बदलेला असेल अशा लाभार्थ्यांनी तात्काळ योग्य त्या पुराव्यासह लेखी अर्ज मुख्य कार्यालयात सादर करावा. तसेच दिव्यांग नागरिकांनी हयातीच्या दाखल्याबाबत होणार्‍या सर्वेक्षणाला महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी केले आहे.