मोठी बातमी : परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल, ६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात परमबीर सिंह यांनी १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली होती.

परमबीर सिंह यांच्याविरुद्ध एका बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात सिंह यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये ६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.