पुणे जिल्हा | जुन्नरच्या पाच गावांची तहान भावण्याची सोय

बेल्हे (वार्ताहर) – अणे पठारावरील दुष्काळग्रस्त पाच गावांना मोफत पाण्याची सोय करण्यात आली आहे. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत या गावांना असाच मोफत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

अणे, नळवणे, व्हरुंडी, शिंदेवाडी, पेमदरा, आनंदवाडी या सर्व गावांना प्रत्येक एका गावाला दिवसातून एक पाण्याची खेप दिली जाणार आहे. राजुरी उंचखडक (ता. जुन्नर) येथील पंकजभाऊ सोपान कणसे यूवा प्रतिष्ठानकडून पाण्याची मोफत सेवा उपलब्ध केली असून यासाठी 25 हजार लिटर क्षमता असलेले हे पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहे.

पंकज कणसे यांना मुबलक पाणी असल्यामुळे त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पाणी हे अणे पठारावरील दुष्काळग्रस्त गावांना देण्याचे ठरवले. दुष्काळग्रस्त अणे पठारावर माणसांची व जनावरांची पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भास होती.

शासकीय टँकर या भागाला पुरेसे नाही. गेले 15 ते 20 दिवस कणसे या पाच गावांचा सर्व्हे करत होते. या दरम्यान त्यांना गावच्या पाण्याची बिकट समस्या असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांन सोमवारी (दि. 29) अणे येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत टँकरचा शुभारंभ करण्यात आला.