nagar | लंके यांच्या स्वीय सहायकावर जीवघेणा हल्ला

नगर {प्रतिनिधी} – दक्षिण लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर दि.६ रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान पारनेर शहरातील बसस्थानक परिसरातील आंबेडकर चौकात काही अज्ञातांकडून जबर मारहाण व जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.वेळीच पोलिसांनी दखल घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके व भाजपाचे खासदार सुजय विखे यांच्यात लढत होऊन निलेश लंके यांनी विजय संपादन केला आहे.व भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील हे पराभूत झाले.

विजयानंतर पारनेर तालुक्यात राजकारण पेटले असून एकमेकांचे समर्थक आमने सामने आले आहेत त्यातच लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर आज दि.६ रोजी दुपारी एकच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला आहे .

त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली खासदार निलेश लंके यांच्या समर्थक राहुल झावरे हे त्यांच्या गाडीवर पारनेर बस स्थानक जवळ असताना हल्ला झाला मात्र या हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही .या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.