चिमुरड्या मुलीला दुबईला नेणाऱ्या पित्याकडून मुलीचा ताबा आईला

नवी दिल्ली : सोडलेल्या पत्नीकडून मुलीला हिसकावून दुबईला नेणाऱ्या पित्याकडून मुलीचा ताबा काढून घेत तिच्या आईकडे संगोपनाची जबाबदारी दिल्ली न्यायलयाने सोपवली.

दिल्ली बाहेर मुलीला नेणार नाही, असे हमीपत्र न्यायलयात देऊनही या पित्याने तिला दुबईला नेले होते. पित्याच्या या कृतीची दखल घेत कौटूंबिक न्यायलयाच्या मुख्य न्यायधिश स्वराना कांता शर्मा म्हणाल्या, मुलांची काळजी फुलाप्रमाणे घ्यावी लागते. मात्र, कायदा मोडणाऱ्या पालकांकडून मुलांच्या आवडींचा विकास योग्य प्रकारे होऊ शकत नाही. त्यामुळे मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिचा ताबा आईकडेच देणे योग्य ठरेल.

या पित्याकडे या मुलीचा ताबा असताना या व्यक्तीने प. बंगालमधील बाबडोगरा येथे तिला घेऊन गेला. तेथून नेपाळला गेला. तेथून तिला घेऊन तो दुबईला गेला होता. त्यानंतर त्या मुलीचा अधिकृत पालक म्हणून मान्यता मिळण्यासाठी त्याने दुसऱ्या न्यायलयात अर्ज केला. त्यावेळी दिल्ली न्यायलयात हा खटला चालू असल्याचे मुलीच्या आईच्या वकीलांनी न्यायलयाच्या निदर्शनास आणले. त्यानंतर न्यायालयाने आईकडे मुलीचा ताबा महिन्याच्या आत देण्यात यावा, असे आदेश दिले.

Leave a Comment