पाकिस्तानातील अल्पसंख्य उमेदवारांविरोधात फतवा..

नवी दिल्ली – पाकिस्तानमधील निवडणुकांचा ज्वर वाडायला लागल्यावर धार्मिक कट्टरवाद्यांकडून अल्पसंख्यांक उमेदवारांविरोधात फतवे देखील काढले जाऊ लागले आहेत. कराचीतील एका धार्मिक कट्टरवादी नेत्याने फेसबुकवर असा फतवा प्रसिद्ध केला आहे. मतदारांनी अल्पसंख्य उमेदवारांना मते देण्याऐवजी मुस्लिम उमेदवारांना मते द्यावीत असे या फतव्यामध्ये म्हटले आहे.

कराचीमधील जामिया उलूम इस्लामियाच्या इमामाने हा फतवा काढला आहे. ही इस्लामी शिक्षण संस्था कराचीमधील कट्टर आणि प्रभावी शिक्षण संस्थांपैकी एक मानली जाते. एक दशलक्ष अल्पसंख्यांकाची मते स्वीकारण्यात काहीच हरकत नाही. मात्र निवडणुकीत अल्पसंख्य उमेदवाराला मते दिली जाण्याची अनुमती नाही, असे या फतव्यामध्ये म्हटले आहे.

बिगर मुस्लिम उमेदवारासाठी आरक्षित जागेवर
जर प्रमुख राजकीय पक्षाने हिंदू उमेदवाराला तिकीट दिले असेल, तर अशा बिगर मुस्लिम उमेदवाराला मते देण्याला इस्लामी कायद्यात अनुमती आहे का ? असा प्रश्‍न विचारला गेला असता, हे उत्तर दिले गेले आहे.

जर अपेक्षित शिक्षण असलेल्या पात्र उमेदवाराला मतदान केले जावे. मात्र जर बिगर मुस्लिम उमेदवार या पात्रतेचा नसेल, तर मुस्लिम उमेदवाराला मतदान केले जावे, असेही या फतव्यामध्ये म्हटले आहे. मात्र धार्मिक आधारावर मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न पाकिस्तानची अधोगती करू शकतो, असे हिंदू नेत्यांनी म्हटले आहे.