सावधान…पुणे लॉकडाऊनच्या दिशेने जाण्याची भीती

पुणे  – शहर लॉकडाऊनच्या दिशेने जाण्याची भीती निर्माण झाली असून, गेल्या 24 तासांत 904 बाधितांची नोंद महापालिकेने केली आहे. तर दिवसभरात नऊ बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यातील दोन पुण्याबाहेरील आहेत.

 

 

बाधितांची संख्या अतिशय वेगाने वाढत असून, गेल्या आठ दिवसांत ती पाचशेवरून नऊशेवर पोहोचली आहे. गेल्या तीन-चार दिवसात तर ती सातशेपेक्षा जास्त होती. मात्र, गुरूवारी ती 904 झाली.

 

 

आजपर्यंत शहरात 11 लाख 70 हजार 383 टेस्ट झाल्या असून, त्यातील बाधितांची संख्या आता 2 लाख 5 हजार 553 झाली आहे. त्यातील 1 लाख 94 हजार 791 रुग्ण बरे झाले आहेत. गुरूवारी 562 जणांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासांतील सात मृतांचा समावेश करून एकूण मृतांची संख्या 4 हजार 876 झाली आहे.

 

ऍक्टिव्ह रुग्ण सहा हजारांजवळ

शहरात करोना बाधितांची संख्या जशी वाढत चालली आहे, तशी ऍक्टिव्ह रुग्णसंख्याही वाढत चालली आहे. सध्या 5,886 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यातील 294 बाधितांची प्रकृती गंभीर असून, 631 बाधित ऑक्सिजनवर आहेत.

Leave a Comment