इराच्या ‘ग्लॅमरस’ फोटोशूटवर चाहते फिदा

मुंबई – परफेक्‍शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आणि महाराष्ट्रात सर्वांना पाणी फाऊंडेशनमुळे सुपरिचित असलेला आमीर खान आपल्या “लालसिंह चढ्ढा’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे या चित्रपटातील  लुकमुळे सोशल माध्यमांमध्ये चर्चेत आहे. तर आमिर खानची मुलगी सुद्धा सोशल मीडियावर त्यांचबरोबरीने चर्चेत आहे.


दरम्यान, बॉलीवूडमध्ये क्‍यूट ऍण्ड स्टायलिश बॉलिवूड किड्स म्हणून इरा खान ओळखली जाते. तिच्या हटके स्टाईलमुळे तर सोशल मीडिया युजर्सच्या मनावर एक जादूच केलेली आहे.

तिच्या प्रत्येक गोष्टींवर युजर्सची नजर असते. त्यामुळे इरा सतत आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. त्यात इराने नुकताच  फोटोशूट केले आहे. या फोटोतील इराचा हॉट आणि सेक्सी अंदाज कुणालाही नक्कीच घायाळ करेल. तिने शेअर केलेले  हे फोटो सध्या खुपच व्हायरल होत आहे.

Leave a Comment