पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करा, जामखेड भाजपाची मागणी

जामखेड (प्रतिनिधी) : पंतप्रधानांना मारण्याची आणि शिविगाळ करण्याची भाषा करणाऱ्या नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जामखेड तालुका भाजपच्या वतीने करण्यात आली. जामखेड पोलीस स्टेशन येथे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. याबाबत लवकर गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अखंड भारताचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल आक्षेपार्य विधान करून त्यांना खुलेआम मारण्याची धमकी नाना पटोले यांनी दिली. हि निषेधार्ह गोष्ट असून सादर वक्तव्य केल्यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात असला तरी भाजप युवा मोर्चा तसेच देशवासीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा तीव्र अंदोलन करण्यात येईल .

यावेळी पंचायत समिती सदस्य भगवान मुरूमकर,रवि सुरवसे, गोरख घनवट, अभिजित राळेभात, प्रवीण चोरडिया, सलीम बागवान, तुषार बोथरा, आण्णासाहेब ढवळे, शिवकुमार डोंगरे, मोहन गडदे, मोहन देवकाते, वैभव कार्ले, उद्धव हुलगुंडे, करणं ढवळे, बापूराव ढवळे, अर्जुन म्हेत्रे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.