अखेर चौथीपर्यंतच्‍या शाळेची वेळ बदलली; शासनाकडून परिपत्रक जारी

मुंबई – राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा त्यानंतर भरवण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून हा जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. शालेय विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक आणि प्रशासनातील अधिकारी यांचे अभिप्राय यामार्फत नोंदवण्यात आले. त्यानुसार काही बाबी शिक्षण विभागाच्या समोर आल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार, आता सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा त्यानंतर भरवण्या येणार आहेत. कारण सध्यस्थितीत अनेक सकाळच्या सत्रात 7 वाजता विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जातात.

ज्यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही आणि त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. यामुळे त्या शाळेत बदल करण्यात यावे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती. यानुसार आता पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर ठेवावी, असे अध्यादेशात सांगण्यात आले आहे.