मेहबूबा मुफ्ती यांच्याविरोधात एफआयआर दाखल; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

Mehbooba Mufti| पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती या अनंतनागमधील बिजबेहारा पोलिस स्टेशनबाहेर धरणे आंदोलन केले होते.

पीडीपी पोलिंग एजंटना टार्गेट करून अटक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली आहे.

मेहबूबा मुफ्ती यांनी लिहिले, “एमसीसीचे उल्लंघन केल्याबद्दल माझ्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडीपीला सत्तेसाठी सत्य बोलण्याची किंमत चुकवावी लागली आहे. स्थानिक प्रशासनाच्या संगनमताने पीडीपीच्या शेकडो पोलिंग एजंट आणि कामगारांना ताब्यात घेण्याला आमचा विरोध होता.”


मेहबूबा मुफ्ती यांनी लिहिले, “अजूनही समाधानी नाही, त्याच प्रशासनाने आमच्या मतदारांना घाबरवण्यासाठी आणि त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून रोखण्यासाठी पारंपारिक पीडीपीच्या बालेकिल्ल्यांमध्ये घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. उल्टा चोर कोतवाल को डांटे,” असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरची अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदार संघातून माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासह २० उमेदवार रिंगणात होते. Mehbooba Mufti|

हेही वाचा:

‘पेंच व्याघ्र प्रकल्प’ राज्यातील पहिला ‘प्लास्टिक मुक्त’ व्याघ्र प्रकल्प