चीनमधील वणव्यात अग्निशामक दलाचे 26 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

बिजींग – चीनमधील दक्षिणेकडील अतिदुर्गम भागातल्या पर्वतावर लागलेल्या वणव्यामध्ये अग्निशामक दलाचे किमान 26 कर्मचारी मरण पावले आहेत. दक्षिण चीनमधील सिचुयान प्रांतातल्या लियांग्शान यी या स्वायत्त भागामधील जंगलात वणवा पेटल्याचे लक्षात आल्यावर या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना शनिवारी तेथे पाठवण्यात आले होते.

ही जागा समुद्रसपाटीपासून सुमारे 3, 800 मीटर उंचीवर पर्वतरांगांमध्ये आहे. त्यामुळे तेथपर्यंत पोहोचणेही दुरापस्त होते. रविवारी दुपारपासून वणवा विझवण्याच्या कामगिरीवर 30 कर्मचारी कार्यरत होते. मात्र वाऱ्याची दिशा बदलल्याने ही आग आणखीनच भडकली. त्यामध्ये हे 26 कर्मचारी होरपळले.

स्थानिक अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 689 अतिरिक्‍त कर्मचाऱ्यांना रवाना केले आहे. आपत्कालिन व्यवस्थापन मंत्रालयाच्यावतीने रवाना केलेले हे कर्मचारी लियांगशानमधील मुली भागात दाखल झाले असल्याचे सिचुयान प्रांततील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment