पुण्यात दोन दिवसांत 18 हजार प्रवेश निश्‍चित कनिष्ठ महाविद्यालयासाठी पहिली नियमित फेरी

 

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 4 – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयात पहिल्या नियमित प्रवेश फेरीत दोन दिवसात 18 हजार 536 विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविले आहेत. शनिवार (दि.6) पर्यंत प्रवेश निश्‍चित करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.
अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धत राबविण्यात येत आहे. 317 कनिष्ठ महाविद्यालयांत 1 लाख 11 हजार 430 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. प्रवेशासाठी एकूण 1 लाख 2 हजार 69 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

86 हजार 728 अर्ज भरुन लॉक करण्यात आले आहेत. 41 हजार 221 अर्ज ऍटो व्हेरीफाईड करण्यात आले आहेत. मार्गदर्शन केंद्राद्वारे 44 हजार 949 अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. कॅपअंतर्गत 69 हजार 124 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविले आहेत.
कोटाअंतर्गत 11 हजार 891 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदविले आहेत. पहिल्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करुन त्यात 42 हजार 709 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालेला आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबतच्या सूचना वेबसाईटवर दर्शविण्यात आलेल्या आहेत. कॅपअंतर्गत 13 हजार 254 तर कोटाअंतर्गत 5 हजार 282 विद्यार्थ्यांचे प्रवेश आत्तापर्यंत निश्‍चित झाले आहेत.