एन्फ्लूएंझाचा नगरमध्ये पहिला बळी

नगर -छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी असलेला व नगरजवळील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा इन्फ्लूएंझा व कोविडच्या संयुक्त संसर्गाने मृत्यू झाला आहे. देशात इन्फ्लूएंझाच्या संसर्गाचे थैमान सुरू असताना महाराष्ट्रातील पहिला व देशातील तिसरा एन्फ्लूएंझाचा बळी नगरमध्ये गेल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

या गंभीर घटनेची दखल राज्य पातळीवरून घेण्यात आली असून बुधवार (दि.15) रोजी सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी तातडीने आरोग्य विभागाची बैठक घेऊन पुढील सूचना व उपाययोजनांची दिशा ठरवली आहे. दरम्यान, एन्फ्लूएंझा व कोविडचा संसर्ग होण्यापूर्वी संबंधित तरूण औरंगाबादहून मुंबई आणि मुंबईतून अलिबागला क्रूझमधून गेल्याची माहिती समोर आली आहे. अलिबागची हीच क्रूज पार्टी त्याला भोवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इन्फ्लूएंझा या विषाणूची नगर जिल्ह्यात एन्ट्री झाल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे. महाराष्ट्रातील हा पहिला तर देशातील तिसरा बळी आहे.
दरम्यान, मंगळवारी मृत युवकाच्या रक्ताचे नमुने इन्फ्लूएंझा बाधित आले असल्याचा खासगी प्रयोग शाळेचा अहवाल मिळाला आणि नगरच्या आरोग्य खात्यात एकच खळबळ उडाली. दुसरीकडे मयत तरुणाचा कोविडचा अहवाल पॉझिटिव्ह होता. मयत तरूण मागील आठवड्यात अलिबागला पर्यटनासाठी गेला होता. तेथून नगरला आल्यावर तो आजारी पडला होता. नगरमधील मोठ्या रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करत्या वेळी त्याची प्रकृती गंभीर होती.

सर्वाधिक रुग्ण 19 ते 60 या वयोगटातील आहेत. याबाबत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात कोविड नियमांचा पालन करण्याचे आवाहन तरुणाच्या मृत्यूबाबत माहिती देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. घोगरे यांनी सांगितले की, संबंधित तरुण हा 10 मार्चपूर्वी अलीबागला पर्यटनासाठी गेला होता. त्यानंतर 11 तारखेला त्याला ताप आला. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रुग्णालयातील डॉक्‍टरानी त्याला ऍडमिट होण्याचा सल्ला दिला होता.

मृत व्यक्तीच्या संपर्कात 66 व्यक्ती
मयत व्यक्तीच्या संपर्कात 66 व्यक्ती होत्या. त्यांची कोविड तपासणी करण्यात आली आहे. त्यातील सहाजण पॉझिटिव्ह होते. मात्र, त्यांना कसलाही त्रास नव्हता. उर्वरित दोघांना किरकोळ त्रास होता. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले त्यांची प्रकृती स्थिर आहे. यासंदर्भात मदत लागल्यास जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. घोगरे यांनी केले.