विकासकामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर : आमदार शिवेंद्रसिंहराजे

सातारा – सातारा- जावली मतदार संघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्या, गावांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत हा निधी मंजूर झाला असून याद्वारे सातारा व जावली तालुक्‍यातील एकूण 36 विकासकामे मार्गी लागणार आहेत.

सातारा तालुक्‍यातील आरे तर्फ परळी येथील गोवर्धन नगरमध्ये रस्ता कॉंक्रीटीकरणासाठी 20 लाख, नागेवाडी पंचशीलनगर येथे रस्ता कॉंक्रीटीकरणासाठी 10 लाख, वर्ये बौद्ध वस्ती येथे रस्ता कॉंक्रीटीकरण, गटर बांधण्यासाठी 10 लाख, काळोशी गंगावणे वस्ती येथे बंदिस्त गटर बांधण्यासाठी 15 लाख, शेंद्रे अण्णाभाऊ साठे येथे बंदिस्त गटर 15 लाख, शेंद्रे आंबेडकर नगर येथे समाजमंदिर दुरुस्ती 10 लाख, कुमठे गायकवाड वस्ती येथे आसनगाव- कुमठे- सातारा जोड रस्ता करणे 20 लाख, करंडी प्रशिक नगर येथे समाजमंदिर दुरुस्ती व पेव्हर बसविणे, रस्ता करणेसाठी 20 लाख, शहापूर येथील अण्णाभाऊ साठेनगर येथे समाजमंदिर दुरुस्ती 10 लाख, धावडशी येथील सिद्धार्थनगर येथे समाजमंदिराला संरक्षक भिंत बांधणे 10 लाख, पोगरवाडी जाधववस्तीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे 15 लाख, कुरुळबाजी येथे संरक्षक भिंत बांधणे 15 लाख, गवडी येथील नालंदा वस्ती येथे रस्ता कॉंक्रीट व संरक्षक भिंत बांधणे 20 लाख, लावंघर येथील मागासवर्गीय वस्ती रस्ता करणे 15 लाख, अंबवडे बु. राजाराम पिलावरे घर ते मातंग वस्ती रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे 25 लाख, सारखळ आंबेडकर नगर अंतर्गत बंदिस्त गटर करणे 10 लाख, सारखळ आंबेडकर नगर अंतर्गतरस्ता कॉंक्रीट करणेसाठी 10 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.

जावली तालुक्‍यातील पानस दलितवस्ती मध्ये संरक्षक भिंत बांधणे 10 लाख, कुडाळ मातंग वस्ती येथे संरक्षक भिंत बांधणे 20 लाख, सावली येथे अंतर्गत कॉंक्रीटीकरण करणे 10 लाख, वहागाव बौद्धवस्ती येथे ओढ्यास संरक्षक भिंत बांधणे 20 लाख, बेलावडे बौद्धवस्ती येथे ओढ्यास संरक्षक भिंत बांधणे 20 लाख, म्हाते बुद्रूक रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे 15 लाख, खर्शी बारामुरे रोहिदास नगर येथे रस्ता संरक्षक भिंत बांधणे 20 लाख, सरताळे दलितवस्ती रस्ता कॉंक्रीट करणे 15 लाख, करंजे हरिजन वस्ती रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे 10 लाख, वालुथ दलित वस्ती रस्ता कॉंक्रीटीकरण करणे

बंदिस्त गटर करणे 10 लाख, मोरावळे दलित वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे 10 लाख, केळघर हरिजन वस्ती समाजमंदिर सुधारणा करणे 15 लाख, रानगेघर मातंगवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे 15 लाख, केंजळ येथे रस्ता कॉंक्रीटीकरण, गटर बांधणे 10 लाख, कुरळोशी हरिजन वस्ती रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधणे 10 लाख, करंदोशी दलितवस्ती रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे 10 लाख, ओझरे येथे रस्ता कॉंक्रीटीकरण, गटर बांधणे 10 लाख, वाटंबे हरिजन वस्ती समाजमंदिराशेजारी संरक्षक भिंत बांधणे 10 लाख आणि विवर दलितवस्ती येथे बंदिस्त गटर बांधण्यासाठी 10 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.