#SriLankaFloods : श्रीलंकेतही अतिवृष्टीचे सावट; आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 19 हजाराहून अधिक लोक…

कोलोंबो – श्रीलंकेत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. आठवड्याच्या शेवटी किमान १५ लोक ठार झाले आणि ५ हजाराहून अधिक कुटुंबांतील १९ हजाराहून अधिक लोक बाधित झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.

राजधानी कोलंबोसह सात जिल्ह्यांमधून मृत्यूची नोंद झाली आहे. तेथे ३०० मिमी पेक्षा जास्त मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला, झाडे उन्मळून पडली, जोरदार वारा, वीज पडण्याबरोबर भूस्खलन झाले, असे आपत्ती व्यवस्थापन केंद्राने सांगितले.

देशभरातील २५ पैकी २० प्रशासकीय जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. किमान ४ हजाराहून अधिक घरांचे अंशत: नुकसान झाले असून, २८ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. श्रीलंकेच्या लष्कराने बचाव कार्यासाठी नौकांसह सुसज्ज सात पथके तयार केली आहेत. बाधित भागात तात्काळ आपत्कालीन प्रतिसादासाठी हवाई दलाने तीन हेलिकॉप्टर तयार ठेवली आहेत.

Korean Conflict : उत्तर कोरियाने पुन्हा पाठवले घाणीचे शेकडो बलून, दक्षिण कोरियाकडून तीव्र निषेध….

आणखी पाऊस आणि पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन शिक्षण मंत्रालयाने सोमवारी देशभरातील सर्व शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ऊर्जा मंत्रालयाने अनेक भागांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे.