पिंपरी | वडेश्वर गोशाळेला चाऱयाची मदत

कार्ला (वार्ताहर) – आंदर मावळातील वडेश्वर येथील त्रिमूर्ती कामधेनू गोशाळेला सुभद जाजु यांनी १००० किलो चाऱयाची मदत केली आहे. त्यामुळे या गोशाळेतील जनावरांचा चाऱयाचा काही दिवसांसाठी प्रश्‍न मिटला आहे

यंदाच्या वर्षी कमी पाऊस झाल्याने चाऱयाची कमतरता आहे. त्यामुळे पशुधनाला चाऱयासाठी शोधाशोध करावी लागते. मावळ तालुक्यातील त्रिमूर्ती कामधेनू गोशाळेत ६० ते ७० गाइ आहेत.

आता उन्हाळा असल्याने चा-याचा तुटवडा भासत आहे. त्यात सुभद जाजु यांनी हा चारा देऊन संस्थेची मदत केली. त्यांनी या केलेल्या मदती बद्दल त्रिमूर्ती कामधेनु गोशाळेचे प्रमुख हभप सहादु आरडे यांनी सुभद जाजु यांचे आभार मानले.