पिंपरी | उन्हाळ्याच्या सुरवातीलाच चाऱयाचे दर वाढले- शेतकरी चिंतेत

वडगाव,  (वार्ताहर) – यंदाचा दुष्काळाचे सावट असल्याने त्याच्या झळा अत्तापासूनच जाणवू लागल्या असून उन्हाळा सुरू होताच जनावरांच्या चाऱयाचे दर वाढल्याने पशूधन असलेले शेतकरी चिंतेत आहेत. मावळ परिसरात दूध व्यावसाय हा शेतीला पुरक म्हणून करण्यात येत असून चाऱयाचे दर वाढल्याने शेतकऱयां आर्थिक झळ बसत आहे.

दसऱयापासून उस तोडणीस सुरवात होत असते. त्यामुळे त्याचे वाडे जनावरांना चारा म्हणून दिले जातो. त्यानंतर उन्हाळा सुरू होताच जनावरांना हिरवा चारा मिळणे कठीण होते. परिणामी वाड्याला पर्याय असणारे मका किंवा ज्वारीचा कडबा किंवा इतर चाऱयाचा वापर केला जातो. दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा महत्वाचा असतो. त्याने दुधाचे प्रमाण वाढते.

मात्र, उन्हाळा सुरू होताच हिरवा चारा मिळणे दुरापास्त होते. त्यामुळे दुभत्या जनावरांच्या दुधावर देखली परिणाम होतो. त्यातच यंदा हवामानाने आपले रुप दाखविले असून सततच्या बदलत्या हवामानामुळे यंदा चाऱयाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे हिरवा तर दूरच मात्र, इतर चाराही मिळणे कठीण झाले असून परिणामी चाऱ्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे दुभती जनावरे आणि इतर सर्वच पशूपालक चिंतेत आहेत.

मावळ तालुक्‍यात शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो. मात्र, पशुखाद्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. दसऱयापासून मिळणारे वाडे ओला चारा म्हणून उपलब्ध होते. मात्र, मार्चच्या सुरवातीलाच ओल्या चाऱ्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. पशुखाद्य, वैरण, ओला चारा मिळत नसल्याने तसेच जो असेल त्याचे दर गगनाला भिडल्याने शेतकऱयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच दुधाला दरही वाढवून मिळतन ही. त्यामुळे चाऱयावर जास्त खर्च व उत्पन्न कमी अशी स्थिती शेतकऱयांची झाली आहे.

वातावरणाचा परिणाम
यंदा सतत बदलत्या वातावरणामुळे शेतकरी यंदा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच उन्हाळा कडक असल्याने जनावरांना चांगल्या प्रतिचा ओला आणि सुका चारा मिळत नाही. जो मिळतो त्याचे दरही गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे दुधाच्या प्रती लिटर उत्पादनाचा खर्च वाढला आहे. दूध संघ तसेच पशुसंवर्धन विभाग, कृषी विद्यापीठ यांनी चाऱ्याचा हा प्रश्न सोडवावा, अशी मगणी शेतकरी, पशूपालकांनी केली आहे.

पशूखाद्याचे दर प्रतिकिलो रुपयांमध्ये
– हरभरा धसकट ७ ते १०
– गहू भुस्सा १० ते १२
– मका ७ ते १०
– पेंड ३७ ते ४०