रिक्षाचालकांकडून नियमांची पायमल्ली

वाहनांवर सर्रास फॅन्सी नंबर, काही वाहने नंबर विनाच!
वाहनांच्या आतील दर्शनिय भागात नंबर बसविण्याची गरज
रवींद्र कदम
नगर (प्रतिनिधी) – नगर शहरात साडेतीन हजारांहून अधिक रिक्षा सुरु आहेत. मात्र या रिक्षाचालकांसह अनेक वाहनचालकांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. वाहनांचा क्रमांक प्रवाशांना दिसेन असा दर्शनिभागता लावने बंधन कारक आहे. मात्र असे न होता अनेक रिक्षांवर फॉन्सी नंबर, वाहन चालकांवडे बॅच नसने, परवाना, तसेच रिक्षालाकांना गणवेश नसल्याचे सर्रास दिसत आहे. त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज नागरिकांमधून होत आहे.

शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थीनी, नोकरी करणाऱ्या महिला, तसेच रात्रीच्या वेळी काही कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. व या घटनेत सातत्याने वाढही होत आहे. याबाबत शहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प, एमअयाडीसी, तसेच तालुका पोलीस ठाण्यात रस्तालुटीचे अनेक गुन्हे दाखल ही करण्यात आले आहेत. यातील काही गुन्हे पोलिसांनी निर्गमीत केले आहेत. त्यानुसार अनेक घटनामंध्ये विना नंबर वाहने, तसेच फॉन्सी नंबर टाकने त्यामुळे गुन्ह्यात वाढ होत आहे. अनेकांना नंबर ओळखू न आल्याने अज्ञात वाहनाविरोधात नाईलाजास्तव तक्रार द्यावी लागते.

गेल्या काही दिवसांपूर्वी मनपाने दळणवळणाच्या दृष्टीने शहरात बस सुरु केली. त्यामुळे नागरिकांना काहीसा सुरक्षित प्रवास मिळत आहे. या बस अनेक भागात जात नसल्याने नागरिकांना रिक्षाचा सहारा घ्यावा लागत आहे. त्यामुळे रिक्षाच महत्वाचे दळणवळाणाचे साधन बनले आहे. सध्या शहरात साडेतीन हजारांहून रिक्षा सुरु आहेत. मात्र काही रिक्षाचालकांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे.

वाहनांचा नंबर रिक्षाच्या आतील दर्शनिय भागात लावणे बंधन कारक आहे. कारण रात्रीच्या वेळी प्रवाशांना तो नंबर दिसल्यास काही घटना घडल्यास तत्काळ संबंधितांना सांगू शकेल. मात्र, अनेक रिक्षांना आतील दर्शनी भागात नंबर सोडाच बाहेरील भागात ही नंबर नाही. ज्या वाहनांवर नंबर आहेत ते ही वाचता येत नाहीत. त्यामुळे अशा वाहनांचा गुन्हेगारी करण्यासाठी सर्रास वापरली जातात. तसेच संबंधित विभागाने विना नंबर, फॅन्सी नंबरवरील वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

शहरात चौका-चौकांत पोलिसांची नजर
शहरात महत्वाच्या चौका-चौकांत पथके तैनात करून विना नंबर, तसेच फॅन्सी नंबर, हेल्मेट नसने, ट्रीपलसीट वाहन चालकांवर कारवाई सुरु आहे. शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे विना लायन्स वाहने आढळून येत आहेत. पालकांनीही याकडे लक्ष दिले पाहिजे. अल्पवयीन विद्यार्थ्यांकडे वाहने देऊ नये असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी केले आहे.

Leave a Comment