वाघोली : कचरा समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांना माजी राज्यमंत्र्यांचा फोन

वाघोली (प्रतिनिधी) : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीलगत असणाऱ्या केसनंद  ग्रामपंचायत हद्दीतील कचरा समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व  भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्यानंतर लागलीच महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे माजी सह पालकमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी पीएमआरडी ए आयुक्त यांना फोन करून  केसनंद मधील कचरा समस्या सोडण्याबाबत सूचना केल्या.

यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा समस्या सोडवण्यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी शासनस्तरावरून जागा मिळवून देणे कामी तसेच कचऱ्याचे संकलन करण्यासाठी पीएमआरडीए च्या निधीतून कचरा गाड्या उपलब्ध करून देण्याबाबत ची मागणी माजी राज्यमंत्री भेगडे यांनी पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे फोन द्वारे केली. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने केसनंद मधील समस्या सोडवण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले.

महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी   केसनंद ग्रामपंचायतीच्या कार्यालयास भेट देऊन पाहणी केली.

यावेळी  पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, केसनंदचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे,पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सातव,  हवेली तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल सातव पाटील, माजी उपसरपंच सचिन जाधव, बापूसाहेब शितोळे, ग्रामपंचायत सदस्य दत्ताआबा हरगुडे, विशाल हरगुडे,सचिन हरगुडे, बाबासाहेब हरगुडे, दिनेश झांबरे, अनिल हरगुडे, विजय जाचक, शरद आव्हाळे, गणेश सातव, उमेश मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.