माजी आमदार प्रा. वसंतराव कार्लेकर यांचे निधन

वर्धा  – जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रा. वसंतराव कार्लेकर (Former MLA Prof. Vasantrao Karlekar) यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांनी 88व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्यावर उद्या सकाळी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 1972 ते 1978 या कालावधीत ते आमदार होते. त्यावेळी विधानसभेचा कालावधी एक वर्ष वाढविण्यात आला होता.

पुढे त्यांनी आयुष्यभर शरद पवार यांच्याशी निष्ठा जोपासली. त्याच स्नेहाने त्यांची राजकीय वाटचाल चालली. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे ते पाच पैकी एक विश्वस्त होते. तसेच पवार मुख्यमंत्री असताना कार्लेकर यांना एसटी महामंडळाचे संचालकपद मिळाले होते. पुढे पणन महासंघाचे त्यांनी दीर्घकाळ संचालकपद भूषविले होते.