मोहरमच्या मिरवणुकी दरम्यान विजेच्या धक्क्याने चौघांचा जागीच मृत्यू; 1३ जण गंभीररीत्या भाजले, 9 जणांची प्रकृती गंभीर

नवी दिल्ली : झारखंड मधील बोकारो जिल्ह्यातील पीतेरवार ब्लॉकमधील खेतको गावात आज मोहरमच्या मिरवणुकीत दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. मोहरमच्या मिरणणुकी दरम्यान ताजियाचा विद्युत तारेशी संपर्क आल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्क्कायक घटना समोर आली आहे.  तरया अपघातात 1३ जण भाजल्याने गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

मोहरमच्या मिरवणुकीत झारखंडमधील बोकारो येथे शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. येथील हाय टेंशन लाईनमुळे एकूण 13 जण गंभीररीत्या भाजले, त्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी ६.०० वाजता बोकारोच्या बर्मो भागातील शेतात घडली. मोहरममध्ये सर्वजण ताजिया घेऊन जात असताना 11000 व्होल्टच्या वायरच्या कचाट्यात आले.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, ताजिया उचलत असताना वरून जाणारी 11,000 हाय टेंशन लाईन ताजियामध्ये अडकली, त्यामुळे ताजियाच्या मिरवणुकीत ठेवलेल्या बॅटरीचा स्फोट झाला. लोकांनी तातडीने सर्व जखमींना डीव्हीसी बोकारो थर्मल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

त्याचबरोबर रूग्णवाहिका नसणे आणि रूग्णालयातील नादुरुस्त व्यवस्था यावरून लोकांनी प्रचंड गोंधळ घातला. मात्र, नंतर जखमींना प्राथमिक उपचारानंतर बोकारोला पाठवण्यात आले आहे.