तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; भीषण अपघातात चौघे ठार

नांदेड – तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी चाललेल्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना चाकूर तालुक्यातील महाळंग्रा शिवारात घडली. वाहन चालकाचे कारवली नियंत्रण सुटल्याने कारची ऊसाच्या ट्राॅलीला पाठिमागून जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. ( car accident)

मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई,कृष्णा मंडके, नर्मन कात्रे (सर्व रा. नांदेड) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अपघातानंतर कारचा चुराडा झाला आहे. या घटनेने मृतांच्या कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील चौघे मित्र तुळजाभवानीच्या दर्शासाठी जात होते. त्यांची कार चाकूर तालुक्यातील महाळंग्रा शिवरात आली असता येथे एका ऊसाच्या ट्राॅलीला त्यांच्या कारची पाठिमागून जोरात धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की, धडकेनंतर कारचा चुराडा झाला आहे. स्थानिकांनी घटनेबाबत पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी जखमींना पोलिसांनी रुग्णालयात भरती केले. जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.