French Open 2024 : ‘गॉफ-सिनियाकोव्हा’नं पटकावले महिला दुहेरीचे विजेतेपद…

French Open 2024 : पॅरिस येथे रविवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत कोको गॉफने कॅटरिना सिनियाकोव्हासोबत खेळताना तिचे पहिले महिला दुहेरीचे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. (French Open 2024 : Coco Gauff and Katerina Siniakova win French Open women’s doubles title) गेल्या वर्षी यूएस ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी अमेरिकेची 20 वर्षीय गॉफ आणि चेक प्रजासत्ताकची सिनियाकोव्हा यांनी प्रतिस्पर्धी जास्मिन पाओलिनी आणि सारा एरानी या इटालियन जोडीचा 7-6, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव झाला.

गॉफने तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅम महिला दुहेरीची अंतिम फेरी गाठली होती. याआधी 2022 मध्ये रोलँड गॅरोस येथे झालेल्या विजेतेपदाच्या सामन्यात आणि 2021 मध्ये यूएस ओपनमध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे सारा इराणीने हिनेसुध्दा तिची माजी जोडीदार रॉबर्टा विंन्सीसोबत दुहेरीतही करिअर स्लॅम पूर्ण केले आहे. या जोडीने 2012 मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले होते. त्याच वर्षी सारा इराणीला एकेरीच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

French Open 2024 : इगा स्विटेकने चौथ्यांदा पटकावले फ्रेंच ओपनचे विजेतेपद…

अरेव्हालो आणि पॅव्हिक यांना पुरुष दुहेरीचे विजेतेपद…

एल साल्वाडोरचा मार्सेलो अरेव्हालो आणि क्रोएशियाचा मॅट पॅव्हिक या जोडीने इटलीच्या सिमोन बोलेली आणि अँड्रिया वाव्हासोरी यांचा सरळ सेटमध्ये पराभव करत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. शनिवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अरेव्हालो आणि पॅव्हिकने 7-5, 6-3 असा विजय मिळवला.