बारा तासात दिल्लीहून मुंबईला ! पुढील महिन्यात रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार..

Delhi to Mumbai in twelve hours : आता दिल्लीहून अहमदाबाद आणि मुंबईला जाणे तुलनेत सोपे होणार आहे. कारण या मार्गावरील सर्व हाय स्पीड ट्रेन आणि लक्झरी ट्रेन अशा रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्याची तयारी रेल्वेने केलेली आहे.

रेल्वेने मुंबई ते दिल्ली हा रेल्वे ट्रॅकची क्षमता वाढवलेली आहे. त्यामुळे या मार्गावरून आता रेल्वे गाड्या ताशी 160 किलोमीटरच्या वेगाने धावू शकतील. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीहून अहमदाबाद आणि मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्या ताशी 160 किलोमीटर वेगाने धावू लागतील. | Delhi to Mumbai in twelve hours

सध्या या रेल्वे गाड्यांचा वेग ताशी 130 किलोमीटर एवढा आहे. वेग वाढल्यानंतर दिल्लीहून मुंबईला पोहोचण्यासाठी फक्त बारा तास लागतील. त्याचबरोबर वेग वाढल्यामुळे 45 मिनिटे ते चार तासांची वेळेची बचत होईल, असे रेल्वेचे म्हणणे आहे. | Delhi to Mumbai in twelve hours

विशेष गोष्ट म्हणजे रेल्वेच्या वेग वाढलेला असला तरी त्याचा कोणताही परिणाम तिकिटावर होणार नाही. तिकिटाचे भाडे पहिल्यासारखेच राहणार आहे. त्याखेरीज अहमदाबाद-मुंबई रेल्वे ट्रॅक देखील अपडेट करण्यात आला असून अहमदाबादहून मुंबईला पोहोचण्यासाठीच्या वेळेत चाळीस मिनिटांची बचत होणार आहे.गाड्यांच्या वेग वाढवण्यासाठी रेल्वेने या मार्गावरील सुमारे 126 पूल देखील अपग्रेड केलेले आहेत.