‘गदर 2’ आता घर बसल्या पाहता येणार; ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित

मुंबई – बॉलीवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांच्या ‘गदर 2’ (Gadar 2) या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ प्रमाणेच ‘गदर 2’ देखील सुपरहिट झाला. तब्बल 22 वर्षानंतर गदरचा दुसरा भाग रिलीज करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केल्यानंतर आता गदर 2 ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

‘गदर 2’ ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. झी 5 ने सोशल मीडियावर या सिनेमाचं एक पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिले की,  उलटी गिनती सुरू करा, तारा सिंह तुमची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे. भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टरर सिनेमा ‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे”. ‘गदर 2’ या चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्यासोबतच उत्कर्ष शर्माचीही मुख्य भूमिका आहे. उत्कर्ष हा दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZEE5 (@zee5)

‘गदर 2’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 526 कोटींची कमाई केली आहे. यासोबतच  ‘गदर 2’ने (Gadar 2)आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील संसदेच्या नवीन इमारतीत दाखविण्यात येणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत तब्बल 300 कोटींचा गल्ला जमावला असून, या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. सर्वाधिक कमाई करणाऱ्या 2023 या वर्षातील टॉप 5 चित्रपटांमध्ये ‘गदर 2’चा समावेश आहे.