पिंपरी | गायकवाड, साबळे जुगलबंदी आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा मानकरी

कार्ला, (वार्ताहर) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधत कार्ला येथे आमदार केसरी बैलगाडा छकडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आमदार केसरी स्पर्धेचा मानकरी वेहरगाव येथील अमित गायकवाड व करंजगाव येथील सरपंच दत्तात्रय गबळू साबळे या जुगलबंदीच्या बैलगाडीने मिळवला.

तर, घाटाचा राजा किताब अमित गायकवाड व तुषार कवडे या जुगलबंदीने मिळवला.
या स्पर्धेत प्रथम मानकरी अमित गायकवाड, तुषार कवडे व दत्तात्रय साबळे ठरले. द्वितीय क्रमांक वेहरगाव येथील मधुकर पडवळ यांचा लक्षा व रामचंद्र आंद्रे यांचा चेंडू तर तृतीय फायनल दुधिवरे येथील देवा बैलगाडा ग्रुप व काले येथील शिवा भैरवनाथ ग्रुप, चतुर्थ क्रमांक वरसोली येथील राजाराम कुटे यांचा वजीर व दिलीप नारायण यांचा शिवा याने मिळवला.

या वेळी मावळचे आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादीचे माजी कार्याअध्यक्ष दीपक हुलावळे, माजी सभापती शरद हुलावळे, उपजिल्हाप्रमूख सुरेश गायकवाड, देवा गायकवाड, सरपंच तुशांत ढमाले, सागर हुलावळे, सनी हुलावळे, सचिन हुलावळे, मधुकर पडवळ, नरहरी लांडगे, संदीप देशमुख, अमोल वायकर, ओमकार पवळे, सोमाभाऊ भेगडे, शुभम मोरे, सोमनाथ बोरकर यांनी बैलगाडा स्पर्धेला भेट दिली.

या बैलगाडा शर्यतीचे संयोजन कार्ला ग्रामपंचातीचे सदस्य सनी हुलावळे, बंटी हुलावळे, गौरव सुर्वे, सुरज हुलावळे, शुभम मोरे, आकाश तिकोने, अभि इंगवले, आकाश हुलावळे, अभिनव दळवी, गिरीश हुलावळे, अमोल इंगवले रायफल ७२०१ ग्रुप, भैरवनाथ तरुण मंडळ, समस्थ ग्रामस्थ कार्ला व बावऱया पक्षा ग्रुप तसेच एकवीरा एम. जी. महाराष्ट्र, एकवीरा क्रिकेट क्लब कार्ला यांनी केले होते.